सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत

उत्तेकर व सकपाळ यांचे कुलदैवत असलेल्या श्री उत्तेश्वराच्या यात्रेला अवघे काही दिवस राहिले आहेत. सोमवार १३ जानेवारी २०२५ देवाचा घाना, १४ जानेवारी देवाचं जागर, आणि १५ जानेवारी २०२५ रोजी पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पहाटे देवाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. स्थानिक नागरीकांकडून मंदिराच्या आजू - बाजूचा परिसर स्वच्छ ्छ केला जात आहे. तसेच पायवाटा ही दूरुस्त केल्या जात आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरी येथून मोठया प्रमाणात यात्रेसाठी उत्तेकर व त्यांचे नातेवाईक येतात. मंदिराकडे जर तुम्ही मुंबई येथून येत असाल तर, पोलादपुर शहरातुन डाव्याबाजूने एक रस्ता महाबळेश्वर च्या दिशेने येतो त्या रस्त्याने ( घाटाने ) वरती यावे. वाडा-कुंभरोशी येथे आल्यावर तेथून ही एक रस्ता श्री उत्तेश्वर मंदिराकडे आला आहे. शिरवली - चतुर्बेट - खरोशी - गावडोशी. ( गावडोशी येथून ही अर्ध्या डोंगरा पर्यन्त रस्ता गेला आहे. ) वाळणे येथून ही तुम्हाला मंदिराकडे जाता येईल पण चालत ...
जर तुम्ही पुणे येथून येत असाल तर वाई - महाबळेश्वर - तापोळा येथून तराफ्यातुन नदी पार करून पलीकडे जाऊन गाढवली या गावातुन मंदिराकडे जाता येईल. श्री उत्तेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकांच्या जेवणाची व्यवस्था श्री. संतोष आखाड़े . आकल्पे मुरा... यांच्याकडून मंदिराच्या पायथ्याशी जी पार्किंग ची जागा आहे तेथे करण्यात आली आहे. तसेच गावडोशी येथून मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी गावडोशी येथे श्री चंदर आनाजी सकपाळ (गुरूजी )यांच्या येथे चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाळणे येथे ही नलावडे बंधू यांच्याकडून यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेला येताना या विभागात थंडी खुप असल्यामुळे स्वेटर, कानटोपी आणि छोटीशी चादर सोबत आणावी जेणेकरून स्वतःचे थंडीपासून संरक्षण होईल. येताना गाडीची टाकी आधीच फुल्ल करून या. पेट्रोल पंम्प ३च आहेत आणि ते कधी चालू तर कधी बंद आसतात. ATM ची सुविधा नाही (एक ते दोनच आहेत ते ही कधी चालू कधी बंद असतात ) यात्रेला येताना थोडे सहकार्य करत या, जे भाविक ह्या यात्रेला पहिल्यांदाच येतायत त्यांना रस्ता माहिती करून दया. जेणेकरून त्यांनाही त्रास होणार नाही. तुम्ही संध्याकाळी ६ च्या आधीच नदीच्या पलीकडे या जेणेकरून तुमचा पुढील त्रास कमी होईल. ( रात्री तराफा बंद राहील. सकाळी ६ वा. चालू होईल )
संपर्क -९७६६८५७९७६
( तुमच्या सोबत लहान मुले, महिला किंवा वयस्कर नागरिक असतील तर त्यांना गरम पाण्याने अंघोळीची व्यवस्था गावडोशी येथे करण्यात आली आहे.)
देवाचा लग्न सोहळा संपन्न झाल्यावर तुम्ही जेव्हा घराकडे जाण्यासाठी निघता तेव्हा तराफ्यातून पलिकडे जाण्यासाठी खुपच वेळ लागतो. तराफा छोटा असल्यामुळे एकाच वेळी पलीकडे वहाने कमी जातात. तराफ्याची वाट न पहाता तुम्ही दुसऱ्या मार्गाने गेलात ( अहीर - वाळणे - गावडोशी - खरोशी - चतुर्बेट - वाडा-कुंभरोशी ) तर तुमच्या फायद्याचे होईल. ४ तास तराफ्यासाठी रांगेत उभे रहाण्या पेक्ष्या वरील मार्गाने ४० किमी अंतर तुम्ही पार कराल.
