सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत

इ. सन. १५०० पूर्व ........ जावळीच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांपैकी एक प्रतापगड पासून ते त्रिवेणी संगम पींपर पर्यंत च्या डोंगर रांगेवर. वाळणे - गावडोशी गावच्या डोंगर रांगेवर उत्तेश्वराची निर्मिति झाली. मामा - भाचा, भाचा हा उत्तेकर ( म्हाबदी- शखपाळ.... उत्तेश्वरामुळे उत्तेकर झाले ) होत. आई वडीलांची परिस्थिती खुप गरीब असल्यामुळे तो मामा (गोगावले गाव दरे ) यांच्याकड़े रहात असे व गुरे सांभाळण्याचे काम करत होता. तो रोज गुरे चारण्यासाठी जंगलात जात असे. काही दिवस लोटल्यावर एका गाईने गोंडस अशा वासराला जन्म दिला. १५ दिवस गाईने व्यवस्थित दूध दिले. नंतर मात्र गाई फक्त वासरालाच दूध देत असे, तेव्हा मामा भाच्यावरती रागाऊ लागला. त्याला बोलला गाई दूध देत नाही. तू गाईचे दूध काढून जंगलातच पित असशील.
भाच्याला मात्र या गोष्टीचे वाईट वाटले. दूध तर मी पित नाही मग गाईचे दूध जाते कुठे ..? याचा शोध घ्यायचा त्याने ठरविले. दूसरा दिवस उजाडला ठरल्या प्रमाणे भाचा ( उत्तेकर ) गुरे चारण्यासाठी जंगलात निघाला मात्र गाईची पाठ सोडायची नाही असे त्याने ठरविले. गाई गोठ्यातून निघाली ती डोंगराने अहीर मुरा, वाळणे मुरा पिसाडी, येथून डोंगराने वरती शेवटच्या टोकावर गेली. भाचा ही तिच्या पाठीमागून तेथे पोहचला. पहातो तर गाईला पान्हा फुटला होता आणि गाई एका दगडावर दूध सोडत होती. भाच्याला आश्चार्य वाटले. संध्याकाळी घरी आल्यावर ही गोष्ट कोनालाही न बोलता तो तसाच झोपी गेला. रात्री झोपेत श्री उत्तेश्वर त्याच्या स्वप्नामध्ये येऊन बोलले की बाळा मी तुझ्या कुळाचा उद्धार करणार आहे. तेव्हा तू माझे छोटे असे मंदिर बांध आणि रोज पूजा करत जा.
कालांतराणे त्याचे लग्न झाले व तो परत वाळणे या गावी रहायला आला. मात्र तो रोज सकाळी लवकर उठून डोंगराने त्या दगडा (शिवलींगा )जवळ येत असे व देवाची पूजा करत असे. काही दिवस लोटल्यावर त्याच्या बायकोला संशय येऊ लागल की भल्या पहाटे माझा नवरा जातो तरी कुटे ..? याचा शोध घ्यायचा तिने ठरविले व एक दिवस गुप-चुप पहाटे त्याच्या मागून निघाली ती थेट शिवलिंगा जवळ. तो पूजा करत होता. त्याला माहिती ही नव्हते की आपली बायको आपल्या पाठीमागून आली आहे. मात्र तेव्हाच देवाचा आवाज त्याला ऐकू आला. श्री उत्तेश्वर त्याला बोलत होते, तू माझी पूजा करायला यायला घाबरतोस. त्याला काहीच समजेना तो देवाला बोलू लागला की परमेश्वरा तुम्ही असे का बोलतात तेव्हा श्री उत्तेश्वर त्याला बोलले की पाठीमागे बघ तु तुझ्या बायकोला घेऊन आला आहेस. पाठी फिरून पाहिले तर खरच त्याची बायको आली होती तेव्हा त्याने तिला विचारले की तू का आलीस ...? तेव्हा ती बोलली की तुम्ही दररोज भल्या पहाटे जाता तरी कुठे मला तुमची काळजी वाटते म्हणून मी तुमच्या पाठीमागून आली आहे. म्हणून तेव्हा तो बोलला परमेश्वरा आता काय करू. श्री उत्तेश्वर तेव्हा त्याला बोलले की तू जंगलातून एकटाच विंचू, साप, वाघ, अस्वल ( तेव्हा जंगल तोड झाली नसल्यामुळे जंगलात अस्वली खुप होत्या. "अस्वलीचे खोर" या नावाने निवळी या गावात आजही एक परिसर आहे.) यांना न घाबरता तु हा डोंगर चढुन नियमित माझी पूजा करायला येतोस, आणि हा तुझा त्रास कमी करण्यासाठी मी स्वतःहा खाली (वाळणे या गावात आंब्याच्या झाडाखाली ) येण्याचे ठरविले आहे. तेव्हा तू माझी तेथे नियमित पूजा करत जा मि तुझ्या कुळाचा उद्धार करीन. मात्र सणासुदीला माझी वरती येऊन पुजा करत जा. त्याने हो म्हटले व घरी आला आणि काही दिवसांनी 'वाळणे' येथे आंब्याच्या झाड़ाखाली छोटेसे मंदिर बांधले व आपल्या कुटुंबासोबत राहू लागला.
कालांतराने त्याला ३ मुले झाले. एका उत्तेकराचे ३ उत्तेकर झाले. काही दिवसांनी त्या ३ ही मुलांची लग्ने झाली. मात्र त्यांच्या बायकांन मुळे त्यांच्यात आप - आपसात भांडने होऊ लागली, भावा भावात मतभेद होऊ लागले. काही दिवस असेच गेले मात्र आता त्यांच्यात पटेनासे झाले . तेव्हा त्या ३ ही भावानी विचार केला की आपण वेगळे राहू. एका भावाने वाळणे येथेच रहावे तर दुसऱ्या दोन भावानी थोडे लांब रहावे. ठरल्या प्रमाणे एक तेथेच राहिला तर दूसरा कोयना नदिने खाली निघाला. तो तापोळा- बामणोली - दत्त मंदिर करून वासोटा - नागेश्वरी येथून खाली चोरवणे येथे रत्नागिरी जिल्ह्यात उतरला. तर तीसरा कोयना नदिने वरती निघाला तो खरोशी- चतुर्बेट - वाडा कुंभरोशी, जावली - हरोशी येथे काही काळ स्थिरावला. (त्याचा एक मुलगा परत पाठी गावडोशी येथे आला तर दूसरा प्रतापगड येथून खाली रायगड जिल्ह्यामध्ये उतरला). आत्ता खरी सुरुवात उत्तेकरांच्या उदयाची झाली होती. सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उत्तेकर भावकी मोठया प्रमाणात आहे. तसेच ऊर्वरीत महाराष्ट्र व गुजरात मध्ये ही आहे. जानेवारी महिन्यात पुनर्वसु आणि पुष्य या नक्षत्राच्या दिवशी सर्व भावकी श्री उत्तेश्वराच्या यात्रे निमित्त एकत्र येतात. सर्व मात्र आपण त्या आपल्या पहिल्या पूर्वजाला ( रामजी व्हमाजी उत्तेकर...आई सकुबाई )यांना विसरतो. श्री उत्तेश्वर मंदिराच्या समोरच छोटस तुळशी वृंदावन आहे. बरोबर त्याला लागूनच आपले पहिले पूर्वज ( रामजी उत्तेकर ) यांची समाधी( थडगे) आहे. तुम्ही जर या वर्षी यात्रेला आलातच तर उत्तेश्वरच्या दर्शना सोबत त्यांचे पण दर्शन घ्या.
