सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत

श्री उत्वेश्वर माहिती
इ. सन. १५०० पूर्व ........
जावळीच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांपैकी एक प्रतापगड पासून ते त्रिवेणी संगम पींपर पर्यंत च्या डोंगर रांगेवर. वाळणे - गावडोशी गावच्या डोंगर रांगेवर उत्तेश्वराची निर्मिति झाली. मामा - भाचा, भाचा हा उत्तेकर ( म्हाबदी- शखपाळ.... उत्तेश्वरामुळे उत्तेकर झाले ) होत. आई वडीलांची परिस्थिती खुप गरीब असल्यामुळे तो मामा (गोगावले गाव दरे ) यांच्याकड़े रहात असे व गुरे सांभाळण्याचे काम करत होता.
श्री उत्वेश्वर माहिती
उत्तेकर व सकपाळ यांचे कुलदैवत असलेल्या श्री उत्तेश्वराच्या यात्रेला अवघे काही दिवस राहिले आहेत. सोमवार १३ जानेवारी २०२५ देवाचा घाना, १४ जानेवारी देवाचं जागर, आणि १५ जानेवारी २०२५ रोजी पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर पहाटे देवाचा लग्नसोहळा पार पडणार आहे. स्थानिक नागरीकांकडून मंदिराच्या आजू - बाजूचा परिसर स्वच्छ केला जात आहे. तसेच पायवाटा ही दूरुस्त केल्या जात आहेत. यात्रेसाठी मुंबई , पुणे , रायगड आणि रत्नागिरी येथून मोठया प्रमाणात यात्रेसाठी उत्तेकर व त्यांचे नातेवाईक येतात. मंदिराकडे जर तुम्ही मुंबई येथून येत असाल तर, पोलादपुर शहरातुन डाव्याबाजूने एक रस्ता महाबळेश्वर च्या दिशेने येतो त्या रस्त्यांने ( घाटाने ) वरती यावे ..वाडा-कुंभरोशी येथे आल्यावर तेथून ही एक रस्ता श्री उत्तेश्वर मंदिराकडे आला आहे. शिरवली - चतुर्बेट - खरोशी - गावडोशी. ( गावडोशी येथून ही अर्ध्या डोंगरा पर्यन्त रस्ता गेला आहे . ) वाळणे येथून ही तुम्हाला मंदिराकडे जाता येईल पण चालत ...